पुढच्या जन्मी आईला व्हायचंय माझी गर्लफ्रेण्ड – नील नितीन मुकेश

आईविषयी केलेल्या खळबळजनक विधानामुळे नील नितीन मुकेश पुन्हा एकदा चर्चेत.

अभिनेता नील नितीन मुकेश

नील नितीन मुकेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाविषयीची ही चर्चा नसून, आईविषयी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे तो चर्चेत आला आहे. आपल्या आईला तिच्या पुढील जन्मी आपली गर्लफ्रेण्ड होण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला. ‘झूम’ या मनोरंजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केले. बॉलिवूडमधील एकूण कूल वातावरण पाहता अभिनयात आणि कारकिर्दित काहीही भव्यदिव्य न करू शकणाऱ्या नीलला त्याच्या या विधानाबाबत काही विशेष वाटले नसले तरी अनेकांना त्याच्या या विधानाचा राग आला असून, ट्विटरवर त्याचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
कदाचित मी जगातील सर्वात रोमॅण्टिक माणूस आहे. मला नकारात्मक व्यक्तीरेखा साकारायला आवडतात, कारण प्रत्यक्ष आयुष्यात मी त्याच्या एकदम विरुद्ध आहे. माझ्या आईने मला एकदा सांगितले होते की, तिला पुढच्या जन्मी माझी गर्लफ्रेण्ड म्हणून जन्म घ्यायची इच्छा आहे, कारण मी अतिशय भावनाप्रधान असून तिला ते खूप भावते, अशाप्रकारचे विधान त्याने केले होते.
अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तरची मूख्य भूमिका असलेल्या ‘वजीर’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. बॉलिवूडमध्ये फार काही चमक दाखवू न शकलेला नील आता ‘गेम ऑफ थ्रॉनस्’मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात असून, ट्विटरकरांनी या कारणावरूनदेखील त्याला निशाण्यावर घेतले होते. भारतीय माणूस इतका गोरा असू शकतो यावर विमानतळावरील अधिकाऱ्यांचा विश्वास बसत नसल्याने नीलला ब्रिटनमध्ये विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते, त्यावेळी देखील तो चर्चेत आला होता. परंतु, यावेळी आईबाबत केलेल्या विधानामुळे तो ट्विटरकरांच्या निशाण्यावर आला आहे.
तीन नावांचा समावेश असलेल्या आपल्या लांबलचक आणि थोड्याशा विचित्र नावामुळेदेखील नीलला अनेकवेळा अवघड प्रसंगाला तोंड द्यावे लागते. एका पारितोषिक वितरण सोहळ्यात अभिनेता शाहरुख खानने नीलला त्याच्या नावावरून छेडले होते. प्राण्यांच्या संवर्धनार्थ काम करणाऱ्या ‘पेटा’ संस्थेच्या हत्तीवरील सफारी विरोधातील प्रचारासाठी ‘पेटा’शी करार करणारा नील कामाच्या पातळीवर आणखी काय करत आहे याविषयी अद्याप समजलेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Neil nitin mukesh says mother wants to be his girlfriend in next birth twitter erupts

ताज्या बातम्या