मानवी स्वभावाच्या विविध कंगोऱ्यांचा वेध ‘स्पिरिट’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २३ ऑक्टोबर रोजी सादर होणार आहे. ‘स्पिरिट’चे लेखन आणि दिग्दर्शन विजय निकम यांनी केले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येक व्यक्तीला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळेस हातून चुकाही घडतात. त्या चुकांचे आपण समर्थन केले तरी मनात कुठे तरी अपराधीपणाची टोचणी लागून राहते, ते या नाटकात पाहायला मिळणार आहे. राजेश देशपांडे, माधवी जुवेकर यांच्यासह नाटकात संदेश उपशाम, संदेश जाधव, राजू तांबे, समीर पेणकर, श्रद्धा मोहिते, रसिका वेंगुर्लेकर आदी कलाकार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi drama spirit coming soon
First published on: 22-10-2015 at 03:57 IST