सध्याचा काळ ऑनलाइनचा आहे. त्यामुळे बरेच जण ऑनलाइन शॉपिंग करतात. त्यातच काही वेळा वेगवेगळ्या ऑफर्सचे मेल, मेसेजही येत असतात. अशाच मेल किंवा मेसेजमधील ऑफर्सला भुलून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक होते. अशाच एका बोगस मेलच्या जाळ्यात अभिनेता निखील रत्नपारखी फसला असून त्याने अशा भूलथापांना फसू नका, असं आवाहनही केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंतभाई कि लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटांत केलेला अभिनेता निखील रत्नपारखी बोगस इमेलच्या जाळ्यात अडकला आहे. मात्र हा इमेल नक्की कोणाचा आहे? तो का करण्यात आला याचा उलगडा लवकरच होणार आहे. ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’ या सारख्या मराठी चित्रपटात झळकलेला निखील लवकरच ‘इमेल फिमेल’ या नव्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव रंजक असून या चित्रपटातून निखीलला आलेल्या मेलचा उलगडा होणार आहे.

‘इमेल फिमेल’ या चित्रपटात निखील, शंतनू ही भूमिका साकारत असून शंतनू हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. एक दिवस अचानक त्याला एक इमेल येतो आणि या इमेल मागचं गुपित घरातल्यांना समजू नये यासाठी शंतनूला तारेवरची कसरत करावी लागते. घरातल्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवण्यासाठी शंतनूला जे प्रयत्न करावे लागतात ते या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या तारेवरच्या कसरतीतून होणारा मनोरंजक घटनाक्रम म्हणजेच ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट.

“आजची पिढी एकमेकांशी ‘कनेक्ट’ राहण्यासाठी इमेल, फेसबुक, व्हॉटसअॅप सारख्या समाजमाध्यमांचा वापर करते. अनेक गोष्टींची माहिती या माध्यमांद्वारे पुरवली जाते. अशाच माहितीतून काय घडू शकते हे दाखवताना सोशल साइट्सचा योग्य वापर केला, तर फायदा आहे. अन्यथा आपण अडचणीत यायला वेळ लागणार नाही हे लक्षात आणून देणारा हा चित्रपट आहे”, असं निखीलने सांगितलं.

वाचा : ‘फत्तेशिकस्त’ची गरुड झेप; मराठा लाइट इन्फान्ट्रीमध्ये झाला समावेश

‘बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत २० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘इमेल फिमेल’ या चित्रपटात निखील रत्नपारखीला नेमका कसला इमेल आला आहे याचा खुलासा होईल. या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे. या चित्रपटामध्ये निखीलसोबत विक्रम गोखले, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi movie emial female actor nikhil ratnaparkhi gets fraud emails ssj
First published on: 18-02-2020 at 16:25 IST