मराठी कलाविश्वात आजवर प्रेमावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यात अनेक चित्रपट तुफान गाजले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांमुळेच यातील काही कलाकारांच्या जोड्याही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. याच प्रेमावर आधारित चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. हॅशटॅग प्रेम हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हॅशटॅग प्रेम’ हे नाव सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत असून या नावावरुन हा चित्रपट ऑनलाइन जगात हरवणाऱ्या तरुणांच्या प्रेमावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री मिताली मयेकर आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

आणखी वाचा- पोपटलालने केलं लग्न? नववधूच्या स्वागतासाठी गोकुळधामवासी सज्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माऊली फिल्म प्रोडक्शनअंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती अनिल गोविंद पाटील यांनी केली आहे. तर दिग्दर्शन राजेश जाधव यांनी केलं आहे. सध्या तरी या चित्रपटातील मिताली आणि सुयशच्या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. मात्र, अन्य कलाकारांची नाव गुलदस्त्यात आहेत. तसंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील निश्चित करण्यात आलेली नाही.