लवकरच उलगडणार ‘राजकुमार’ची प्रेमकथा; प्रवीण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत

जाणून घ्या, आगामी चित्रपटाविषयी

कलाविश्वात सध्या नव्या धाटणीच्या आणि आशयाच्या चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. यामध्ये अनेकदा प्रेमकथांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतं. ‘दुनियादारी’,’मितवा’ अशा अनेक चित्रपटांवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केलं. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटांच्या यादीत आणखी एका नवा चित्रपटाचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता प्रवीण तरडे झळकणार आहेत.

‘बबन’ या चित्रपटात झळकलेली जोडी भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव ही जोडी साऱ्यांनाच ठावूक असेल. उत्तम अभिनयाच्या जोरावर या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे ही जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाली. बबन या चित्रपटानंतर भाऊसाहेब आणि गायत्री ही जोडी लवकरच राजकुमार या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

अलिकडेच ‘राजकुमार’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट २३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केलं आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधवसोबत अभिनेता प्रवीण तरडे, देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोकळे आणि अर्चना जॉईस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New marathi movie rajkumar actor pravin tarde ssj

ताज्या बातम्या