लहानग्यांच्या होड्यांना वाहून नेणारा खोडकर पाऊस.. प्रियकर-प्रेयसीच्या आनंदात बरसणारा रिमझिम पाऊस.. शेतकऱ्याला सुखावणारा समाधानकारक पाऊस… तर कधी गरजणारा घाबरवून सोडणारा बेताल पाऊस… अनेकविध रूपांनी सजलेला हा पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. आजही आबालवृद्धांच्या ओठी ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ हे बालगीत रुळताना दिसलं की आपसूकच वातावरण एकदम रम्य होऊन जातं. पावसाच्या अनेकविध रूपांपैकी अशाच एका रूपावर ‘येरे येरे पावसा’ हा आगामी मराठी चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी निर्मित आणि शफक खान दिग्दर्शित ‘येरे येरे पावसा’ ह्या चित्रपटाद्वारे पावसाची कुठली बाजू आपल्याला पाहायला मिळणार हे सध्या गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाचा कथाविषय मायबाप प्रेक्षकांसमोर आणण्यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. खासकरून लहान मुलांमध्ये उत्कंठा वाढवणारे हे पोस्टर साऱ्यांच्याच पसंतीस पडले आहे.

‘येरे येरे पावसा’ चित्रपटाचे संवाद अभिषेक संतोष जया करगुटकर यांचे आहेत तर ही कथा लिहिली आहे भूषण दळवी आणि शफाक खान यांनी. सुशांत एन.किशोर पवार यांच्या सुमधुर संगीताची साथ या ‘येरे येरे पावसा’ला लाभणार आहे तर ‘मिशन मंगल’ फेम चंदन अरोरा हे हिंदीतील अनुभवी संकलक या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत काम करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi movie ye re ye re pavasa coming soon ssv
First published on: 20-10-2019 at 13:15 IST