करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स पुन्हा एकदा सुरु करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान ’83’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे. अभिनेता रणवीर सिंगने स्वत: पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ’83’ चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. ‘ती वेळ आली आहे… 83 हा चित्रपट ख्रिसमसमध्ये चित्रपटगृहामंध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन रणवीरने फोटो शेअर करत दिले आहे.

या पूर्वी ’83’ हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New released date of 83 ranveer singh share a post avb
First published on: 27-09-2021 at 10:30 IST