नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या उत्साहात आपण रिजोल्यूशन करतो आणि काही कारणास्तव ती बारगळतात देखील. त्यामुळे मला असं वाटतं त्यापेक्षा वर्षभरात आपण छोटे छोटे गोल्स ठरवावे. जे आपण पूर्ण करु शकू. मी तर हाच फंडा फॉलो करते. येत्या वर्षातील एक महत्वाचं गोल म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे. २०१६ मध्ये माझे काही सिनेमे रिलीज होतायत काही सिनेमाचं चित्रीकरण सुरु होणार आहे. त्यामुळे खूप धावपळ हि ओघाने आलीच म्हणून मी फिटनेस आणि फिजिकल स्ट्रेन्थकडे अधिक लक्ष्य देणार आहे. ‘बंध नायलॉनचे’ हा येत्या वर्षात प्रदर्शित होतोय तर एका हिंदी सिनेमाचं चित्रीकरण देखील सुरु केलंय.
– श्रुती मराठे (अभिनेत्री)
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2015 रोजी प्रकाशित
माझा संकल्पः रिजोल्यूशन पेक्षा छोटे गोल्स करणे पसंत करते
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या उत्साहात आपण रिजोल्यूशन करतो आणि काही कारणास्तव ती बारगळतात देखील
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 30-12-2015 at 07:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year resolution of actress shruti marathe