टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा सोशल मिडीयावर सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. निया कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचेही अपडेट सोशल मीडियावर टाकत असते. तिने इंस्टाग्रामवर टाकलेले व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. नियाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. फक्त २४ तासात हा व्हिडीओ सहा लाखपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.

नुकतीच निया मध्यप्रदेशातील इंदौर येथे जाऊन आली. इथेच ‘फायर पान’ खातानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फायर पान खाण्याआधी ती खूप घाबरलेली दिसतेय. परंतु, लोकांच्या सांगण्यावरून ती ते पान खाते. ‘नियाने खूप ओव्हर अॅक्टिंग केली आहे.’ असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/BzvvPEhFiTj

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियाने आतापर्यंत अनेक मालिका, रिऍलिटी शो आणि कॉमेडी शो मध्ये काम केले आहे. ‘काली- एक अग्नि परीक्षा’ मधून तिने अभिनयक्षेत्रातील तिच्या प्रवासाला सुरुवात केली होती. ‘एक हजारों में मेरी बहना है’ ,’जमाई राजा’ या मालिकांनी तिला लोकप्रियता मिळवून दिली.