बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड या दोन्ही कलाविश्वामध्ये सध्याच्या घडीला लोकप्रिय असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली ही जोडी कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडीओज शेअर करत असतात. त्याच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. सध्या सोशल मीडियावर निक-प्रियांकाचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र, या फोटोवरुन प्रियांकाचा हट्टापुढे निकला झुकावं लागल्याचं दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्री हट्टापुढे कधीच कोणाचं काही चालत नाही असं खरं तर म्हटलं जातं. असंच काहीसं निकच्या बाबतीत घडलं आहे. सध्या निक -प्रियांकाच्या आगामी ‘टेक्स फॉर यू’ (Text For You) या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून हे चित्रीकरण झाल्यानंतर प्रियांकाने निककडे एक हट्ट केला आणि तो निकला पुरवावाच लागला. या प्रसंगाचे काही फोटो प्रियांकाच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आले आहेत.


‘टेक्स फॉर यू’ या चित्रपटाचं सध्या लंडनमध्ये चित्रीकरण सुरु आहे. हा रोमॅण्टिक ड्रामा आहे.चित्रीकरणातून थोडा वेळ मिळाल्यानंतर निक -प्रियांका लंडनमध्ये फिरत होते. मात्र, अचानक प्रियांकाला फोटो काढण्याची लहर आली आणि तिने निककडे फोटो काढण्यासाठी हट्ट धरला. विशेष म्हणजे निकनेदेखील त्याच्या पत्नीचा हा हट्ट पूर्ण केला आणि भररस्त्यात तो प्रियांकासाठी फोटोग्राफर झाला.

आणखी वाचा- प्रियांकाने शेअर केला निकसोबतचा सोफ्यावरील रोमॅण्टिक फोटो आणि…

दरम्यान, या प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या निक-प्रियांका ‘टेक्स फॉर यू’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखक जीम स्ट्रॉसे यांनी लिहिली असून दिग्दर्शनदेखील त्यांनीच केलं आहे. हा चित्रपट एका जर्मन कादंबरीवरुन साकारण्यात येत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त प्रियांका ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूडपटातदेखील झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas became a photoghraper for priyanka chopra ssj
First published on: 17-12-2020 at 08:40 IST