गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड सिंगर निक जोनास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. दोघांनी उघडपणे आपल्या नात्याची कबुली दिली नसली तरी या दोघांना अनेकदा एकत्र फिरताना पाहून नक्कीच काहीतरी शिजतंय याची खात्री चाहत्यांना झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकानं निकच्या घरातील कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. प्रियांकानं निकच्या कुटुंबातील अनेकांची भेट यावेळी घेतली. त्यामुळे हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियांकाच्या हँडबॅगची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल !

निकच्या भावाला जेव्हा प्रियांकाबद्दल विचारलं तेव्हा केव्हिन जोनासनं तिचं कौतुक केलं मात्र तिच्याविषयी अधिक बोलायला नकार दिला. प्रियांकाचं व्यक्तीमत्त्व खूपच प्रभावी आहे. मी तिला यापूर्वीही भेटलो आहे. पण तुम्हाला ती कशी आहे याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्ही निकलाच विचारा. तो तिच्याबद्दल अधिक सांगू शकेल असं केव्हिन म्हणाला. २०१७ च्या मेट गाला इव्हेंटमध्ये पहिल्यांदा निक आणि प्रियांका एकाच गाडीतून आले होते. ‘आम्ही एकाच ब्रँडचे कपडे परिधान केले होते, म्हणून आम्ही एकत्र आलो असं उत्तर प्रियांकानं दिलं होतं’.

अबब! ‘भारत’ चित्रपटासाठी प्रियांकानं आकारलंय चक्क एवढ्या कोटींचं मानधन?

त्यानंतर वर्षभरानं हे दोघंही अनेकदा एकत्र दिसले. तेव्हापासून निक आणि प्रियांका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण दोघांनीही उघडपणे आपल्या नात्याविषयी कधीही चर्चा केली नाही ना इतरांपासून आपलं नातं लपवलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas brother kevin jonas said on meeting priyanka chopra
First published on: 15-06-2018 at 16:44 IST