बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सातत्याने चर्चेत असते. कधी हॉलिवूड चित्रपटांमधील यशस्वी घौडदौड तर कधी परदेशात सुरू केलेला नवा व्यवसाय अशा कारणांसाठी प्रियांकाला ओळखले जाते. नुकतंच प्रियांकाने तिचा ४० वा वाढदिवस सारा केला. या वाढदिवसाचे अनेक फोटो तिचा पती निक जोनसने शेअर केले होते. त्यानंतर आता निकने यादरम्यानचा एक खास फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने प्रियांकाला एक गोड नावही दिले आहे.

प्रियांका चोप्राच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त निक जोनसने एका पार्टीचेही आयोजन केले होते. यात प्रियंका, निक जोनास आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. तिचा वाढदिवस मॅक्सिकोमध्ये दणक्यात साजरा करण्यात आला. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आणखी वाचा – प्रियांका चोप्रा पुन्हा होणार आई? नुकतीच ६ महिन्यांची झालीये लेक मालती

त्यानंतर आता निकने त्याच्या इन्स्टाग्रामवर प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो प्रियांका चोप्राच्या ४० व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधला आहे. या फोटोला निकने फार हटके कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे यात त्याने प्रियांकाला एक टोपणनावही दिले आहे.

आणखी वाचा – प्रियांका चोप्रा- निक जोनसचं लिपलॉक, समुद्र किनाऱ्यावरील रोमँटिक अंदाज चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा फोटो शेअर करत निकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे “लेडी इन रेड…प्रियांका चोप्रा”. या फोटोत प्रियांकाने लाल रंगाचा कट-आउट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तर निकने गुलाबी को-ऑर्डर सेट परिधान केला आहे. यात ते दोघेही फार सुंदर दिसत आहेत. या लाल रंगाच्या ड्रेसमुळेच त्याने प्रियांकाला खास नाव दिल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान सध्या प्रियांका ही तिच्या ‘सिटाडेल’ या हॉलिवूड वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ही एक आगामी वेब सिरीज आहे. याचे दिग्दर्शन ‘अ‍ॅव्हेंजर्स’ फेम रुसो बंधूंनी करत आहे. तिच्यासोबत या वेबसीरिजमध्ये रिचर्ड मॅडेन देखील दिसणार आहे. त्यासोबत ती ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे शूटिंगमध्येही व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.