सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘नूर’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. मंगळवारी सोनाक्षीने या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. या पोस्टरमध्ये सोनाक्षीच्या आयुष्यातले दोन पर्व दाखवण्यात आले आहेत. सुन्हिल सिप्पी यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रथमदर्शनी चांगला वाटतो. सोनाक्षीचा या सिनेमातला लूकही चांगला आहे.
या ट्रेलरमध्ये सोनाक्षी स्वतःला पत्रकार कमी आणि एक विदुषकच जास्त मानत असते.
या ट्रेलरमध्ये तुम्हाला सोनाक्षीचे वेडेपण पाहायला मिळेल. मजा मस्तीमध्ये सुरु झालेला हा ट्रेलर शेवटाला एकदम गंभीर वळण घेतो. अजून एक गोष्ट जी या ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेते ती म्हणजे, गुलाबी आंखे जो तेरी देखी हे गाणे. ७० च्या दशकातल्या या गाण्याला एक वेगळा अंदाज देण्यात आला आहे. या गाण्यावर सोनाक्षी नृत्य करताना दिसते.
सुन्हिल सिप्पी यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा पाकिस्तानी लेखिका सबा इम्तेयाजी यांचे ‘कराची- यू आर किलिंग’ मी या पुस्तकावर आधारित आहे. २१ एप्रिलला सोनाक्षीचा ‘नूर’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षीसह या सिनेमात यूट्यूब कॉमेडियन कनन गिल आणि पूरब कोहली यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.