गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये आतापर्यंत अनेक व्यक्तींच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली आहे. क्रीडापटूंपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांचा जीवनप्रवास या बायोपिकमधून उलगडण्यात आला. त्यातच आता बलात्कार प्रकरणी दोषी असणाऱ्या आसाराम बापूवर लवकरच बायोपिक करण्यात येणार आहे. बॉलिवूड निर्माते सुनील बोहरा हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकार उशीनर मजूमदार यांनी लिहीलेल्या ‘गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ या पुस्तकावर सुनील बोहरा चित्रपट तयार करणार आहेत. विशेष म्हणजे सुनील यांनी या चित्रपटाच्या राईट्सचीही खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे.

“उशीनर मजूमदार यांनी आसारामवर लिहीलेलं पुस्तर मी वाचलं आहे. या पुस्तकात पी.सी. सोलंकी यांनी पीडित मुलीचा खटला पैसे न घेतला कसा लढविला होता हे देखील वाचलं. पी.सी. सोलंकी यांनी हा खटला जिंकत पीडित मुलीला न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या या कामामुळे मी प्रचंड प्रभावित झालो आणि त्या क्षणी आसारामवर बायोपिक करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या खटल्याशी संबंधीत जोधपूर आणि सूरत कारागृहातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही मला प्रेरित केलं”, असं सुनील बोहरा यांनी सांगितलं.

दरम्यान, सुनील बोहरा यांनी ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’, ‘तनु वेड्स मनु’, ‘शाहिद’ आणि ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मिती केली आहे. त्यानंतर त्यांनी आसारामवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र या बायोपिकमधून आसारामच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा होणार आहे, हे मात्र नक्की.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now a hindi biopic on tainted asaram bapu
First published on: 30-04-2019 at 09:07 IST