अंगावर बॉम्ब जॅकेट घालून एका पाकिस्तानी गायिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. रबी पिरजादा असं या पॉप सिंगरचं नाव असून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे रबीचे न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. सोशल मीडियावर लीक झालेल्या या फोटो व व्हिडीओंना व्हायरल न करण्याचे आवाहन नेटकऱ्यांनी केलं आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांच्याशी वाद झाल्यानंतर हे व्हिडीओ लीक झाल्याची शंका काही नेटकरी उपस्थित करत आहेत. रबी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा सापांसोबत खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
रबीने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर सरकारकडून घालण्यात आलेल्या संचारबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तिने अंगावर बॉम्ब जॅकेट घातलेला एक फोटो ट्विट करून, ‘मोदी हिटलर, मला तुम्हाला मारण्याची इच्छा आहे. काश्मीर की बेटी’, असं वादग्रस्त विधान केलं होतं. तिच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं होतं.