अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी दिली गुड न्यूज; घरी चिमुकल्याचं आगमन

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी नुसरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Nusrat Jahan, Nusrat Jahan boy, Nusrat Jahan pregnant, Nusrat Jahan welcomes baby boy, Nusrat Jahan delivery,
नुसरत यांना काल रुग्णालयता दाखल करण्यात आले होते.

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झाले आहे. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी नुसरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नुसरत आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

नुसरत या नॉर्मल चेकअपसाठी २५ ऑगस्ट रोजी अभिनेता यश दासगुप्तासोबत रूग्णालयात गेल्या होत्या. पण त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना रूग्णालयात दाखल होण्यास सांगितले. आता २६ ऑगस्ट रोजी नुसरत यांनी एका मुलाला जन्म दिला असल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

डिलिव्हरीपूर्वी नुसरत यांनी हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘Faith Over Fear’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. आता नुसरत यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिल्याचे समोर आले असून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर केला आहे.

नुसरत यांना आई बनतानाचा हा क्षण आणखी स्पेशल बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी डॉक्टरांकडे एक विनंती सुद्धा केली होती. डिलिव्हरीच्यावेळी यश दासगुप्ताला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. बाळाला जन्म देत असताना यश दासगुप्ता त्यांच्यासोबत असावा, अशी त्यांची इच्छा होती.

२०१९ मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली

अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचे सांगितले. त्यामूळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती. नुसरत जहाँ नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी नकार देत होत्या, असे निखिल जैन याने सांगितले होते. ऑगस्ट २०२० पासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्या घर सोडून गेल्या असल्याचे देखील निखिल जैनने सांगितले होते. त्यानंतर त्या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nusrat jahan gives birth to baby boy avb