भारतीय संस्कृतीमध्ये विवाहसंस्थेला विशेष स्थान आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, लग्नामुळे केवळ दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंब जोडली जातात. मात्र काही जणांच्या मते लग्न म्हणजे आपल्या मार्गातील अडथळा असं वाटतं. त्यामुळेच कित्येक तरुण-तरुणी लग्नापासून दूर पळत असतात. मात्र ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाच्या माध्यमातून या तरुणाईच्या मनाची द्विधा अवस्था आणि लग्न करण्यामागचं खरं कारण याचा खुलासा होणार आहे.
समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची निर्मिती पल्लवी विनय जोशीने केली असून नुकत्याच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमध्ये झळकलेल्या सुबोध भावेने मजेशीर अंदाजात ‘मी बायकोला घाबरतो’ असं म्हटलं आहे. त्यामुळे विनोद करता करता या चित्रपटातून लग्न संस्थेवर भाष्य करण्यात येणार आहे.
‘शुभ लग्न सावधान’मध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये या दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहता येणार असून हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.