आजवर छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची निर्मिती झाली, अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. मात्र, काही मालिका या प्रेक्षकांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहिल्या. यामध्ये ‘अवंतिका’, ‘दामिनी’, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘एक धागा सुखाचा’ अशा काही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालून आहेत. त्यामुळे या मालिका विसरणं प्रेक्षकांना शक्य नाही. खरं तर या मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येत नसल्या तरीदेखील त्या मालिकांमध्ये, त्यातील कलाकारांमध्ये रमायला प्रेक्षकांना आवडतं. विशेष म्हणजे या लोकप्रिय मालिकांमधील ‘एक धागा सुखाचा’ ही मालिका लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० वर्षांपूर्वी ‘एक धागा सुखाचा’ ही मालिका तुफान गाजली होती. २६ भागांची ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘क्लासिक मनोरंजन’ या यूट्यूब ओटीटी चॅनेलवर ही मालिका पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

अभिनेते विक्रम गोखले, चंद्रकांत गोखले, सुहास जोशी, नयनतारा, जयंत सावरकर, आनंद अभ्यंकर, किशोर प्रधान, विजय कदम, विजय चव्हाण, सोनालिका जोशी, संतोष जुवेकर, अनिल हर्डीकर, अजित केळकर, उमेश कामत या दिग्गज कलाकारांच्या सहजसुंदर उत्कृष्ट अभिनयाने ही मालिका घराघरात पोहोचली होती. यातील चंद्रकांत गोखले, नयनतारा, आनंद अभ्यंकर, किशोर प्रधान, विजय चव्हाण हे दिग्गज कलाकार आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचा अविस्मरणीय अभिनय या मालिकेत रसिकांना पहायला मिळणार आहे.

दरम्यान,“एक धागा सुखाचा” ही मालिका १ जानेवारीपासून ‘क्लासिक मनोरंजन’ या यूट्यूब ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित होत असून सदर मालिका दर शुक्रवारी दुपारी २ वाजता रसिकांना पहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old tv show ek dhaga sukhacha coming soon ssj
First published on: 24-12-2020 at 16:24 IST