scorecardresearch

Premium

वन्स अपॉन टाइम इन हॉलीवूड

राज्य करण्याची सुप्त इच्छा जवळपास प्रत्येक माणसात असते.

वन्स अपॉन टाइम इन हॉलीवूड

राज्य करण्याची सुप्त इच्छा जवळपास प्रत्येक माणसात असते. आणि या इच्छेला जिद्द, चिकाटी, कर्तृत्व व पोषक वातावरणाचे पाठबळ मिळाले की हिटलर, अलेक्झांडर, नेपोलियन बोनापार्ट, चेंगेज खान यांसारखी जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी व्यक्तिमत्त्वं तयार होतात. अशाच अलौकिक माणसांच्या पावलांवर पाऊल ठेवत मार्गक्रमण करणाऱ्या चार्ल्स मेन्सनच्या कारकीर्दीवर आधारित ‘वन्स अपॉन टाइम इन हॉलीवूड’ हा चित्रपट येत आहे. या क्राइमपटात हॉलीवूड सुपरस्टार ब्रॅड पिट व लिओनार्दो दी कॅप्रिओ झळकणार आहेत. लिओनार्दोने इन्स्टाग्राम पोस्टवरून या अगामी प्रकल्पाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. ‘किंग ऑफ क्राइम’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या चार्ल्स मेन्सनने १९६०-७० च्या दशकात हॉलीवूडमध्ये आपली दहशत पसरवली होती. तो इतका विकृत होता की निरपराध लोकांना मारून त्यांचे अवयव काढणे हा त्याचा आवडता उद्योग होता. १९६२ साली त्याला पहिल्यांदा अटक झाली. त्याआधी त्याने तब्बल ३२ लोकांची हत्या केली होती. पुढे बराच काळ त्याच्यावर खटला सुरू होता. परंतु कोणत्याही ठोस पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आले. गिटार वाजवण्यात तरबेज असलेला थंड डोक्याचा ‘चार्ल्स’ दिसायला अगदी एखाद्या हॉलीवूड सुपरस्टारप्रमाणे होता. तुरुंगात असताना केवळ संवाद शैलीच्या जोरावर त्याने गुन्हेगार तरुणांची एक लहानशी टोळी तयार केली होती. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्याच्या विकृत कारकिर्दीची सुरुवात झाली. तुरुंगाबाहेर पडल्यानंतर त्याने अमेरिकेतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना एकत्र करण्यास सुरुवात केली. आणि पाहता पाहता त्याच्या टोळीचे जणू एका फौजेत रूपांतर झाले. त्याने या फौजेला ‘वेन हॉटन फॅमिली’ असे नाव दिले होते. तुरुंगात जाऊन आलेला जवळपास प्रत्येक तरुण त्याच्या या कुटुंबात भरती होत होता. मोठय़ा प्रमाणावर गुन्हेगार एकवटल्यामुळे पुढे ते पोलीस प्रशासनालाही आव्हान देऊ लागले. त्याच दरम्यान त्यांनी आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी शेरोन टेटे, रोमन पोलंस्की यांसारख्या हॉलीवूड सेलिब्रिटींच्या हत्येचे सत्र सुरू केले. १९७० साली चार्ल्स मेन्सनला पुन्हा एकदा अटक करण्यात आली. २०१७ साली तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला.‘वन्स अपॉन टाइम इन हॉलीवूड’ या चित्रपटात दिग्दर्शक क्विंटन टॅरेन्टिनो हे चार्ल्स मेन्सनचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या चित्रपटात कोणता कलाकार कोणती भूमिका बजावणार हे अद्याप जाहीर झाले नसले तरी ब्रॅड पिट व लिओनार्दो दी कॅप्रिओ या दोन सुपरस्टार कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Loksatta Safarnama Travel to heritage site India is a symbol of rich cultural heritage
सफरनामा: सफर वारसास्थळांची..
shukra and guru conjection 2024 positive impact these zodiac sing aries tula zodiac
तब्बल १२ वर्षांनंतर शुक्र आणि गुरुचा संयोग; ‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस? प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता
Ajit Pawar on Amol Kolhe
“अजित पवार शिरुरमध्ये आहेत याकडे आव्हान म्हणून पाहण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचं सूचक विधान
Maratha survey Buldhana district
मराठा सर्वेक्षण ठरतंय अडथळ्याची शर्यत! आठवड्यात साडेसहा लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान; आयोगाच्या सदस्या बुलढाण्यात मुक्कामी

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Once upon a time in hollywood

First published on: 08-07-2018 at 03:37 IST
Next Story
मनथरार!

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×