Anna Beatriz Pereira Alves Dies: ओन्ली फॅन्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट स्टार म्हणून काम करणाऱ्या ॲना बेट्रिझ परेरा अल्वेस (वय २७) या ब्राझीलीयन मॉडेलचा मृत्यू झाला आहे. ब्राझील मधील एका हॉटेलच्या बाल्कनीत दोन पुरुष सहकाऱ्यांसह ॲडल्ट चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना ॲना खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. हॉटेलच्या कोर्टयार्ड परिसरात ॲनाचा मृतदेह आढळून आला, अशी बातमी अमेरिकेच्या सन या वृत्त संकेतस्थळाने दिली आहे.

ॲनाच्या मृत्यूनंतर तिच्यासह शुटिंग करत असलेल्या दोन पुरुष सहकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र चौकशीदरम्यान दोघांनीही परस्परविरोधी माहिती दिली. दोघांचाही जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. ॲनाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. हे प्रकरण दिसते तेवढे सरळ नाही, त्यामुळे सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. ही दुर्घटना अपघातही असू शकते किंवा हा ठरवून केलेला खूनही असू शकतो.

दरम्यान ॲनाचा प्रियकर पेड्रो हेन्रिकने सन संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, या गुन्ह्याशी संबंधित सर्व माहिती पोलिसांनी गोळा केली आहे आणि ते या घटनेचा मुळापासून तपास करत आहेत. जर या घटनेसाठी कुणी जबाबदार असेल तर त्याला सोडले जाणार नाही. जे दोषी असतील त्यांना लवकरच पकडले जाईल. पेड्रोने सोशल मीडियावर पोस्ट टाकून ॲनाला श्रद्धांजली वाहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२३ जानेवारी रोजी सदर घटना घडली असून याची माहिती ॲनाच्या घरीही कळविण्यात आली. तिच्या मित्राने सांगितले की, ही घटना खूप दुःखद आहे. तिला आयुष्यात खूप काही करायचे होते. तिला सोशल मीडियावरचा तिचा वावर वाढवायचा होता. तिच्या भविष्याच्या कल्पना अतिशय चांगल्या होत्या. मात्र तिचा अचानक मृत्यू झाल्यामुळे आम्हा सर्व मित्र-मंडळींना धक्का बसला आहे.