शाळा म्हटलं की प्रार्थना, श्लोक आणि पसायदान या गोष्टी सर्वांनाच आठवत असणार. परिपाठाच्या तासाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून ‘पसायदान’चा सूर आळवला की वातावरण प्रसन्न व्हायचं. हेच पसायदान आता ‘घुमा’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून एका नव्या ढंगात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ‘मास फिल्म्स’ प्रस्तुत आणि महेश काळे दिग्दर्शित ‘घुमा’ या चित्रपटात ‘ऑपेरा स्टाइल’ पसायदान ऐकायला मिळणार आहे.
ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे ओस पडत चाललेल्या मराठी शाळा आणि एकूणच शालेय शिक्षण पद्धतीवर मार्मिक भाष्य करणारा ‘घुमा’ हा चित्रपट आहे. या पसायदानातूनही ग्रामीण भागातील मराठी शाळांचं भीषण वास्तव दाखवण्यात आलं आहे. एका गरीब घरातील विद्यार्थ्याचा शाळेत जाण्यापर्यंतचा प्रवास या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे शाळेची दुरवस्था आणि वर्गात शिकवण्यासाठी शिक्षक करत असलेली धडपडही दिसते.
वाचा : लिव्ह- इनमध्ये राहण्यासाठी टायगर आणि दिशाची तयारी सुरू?
महेश काळे दिग्दर्शित आणि शरद जाधवची मुख्य भूमिका असलेला ‘घुमा’ हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.