John Cena in 96th Academy Awards : २०२४ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचं सूत्रसंचालन जिमी किमेलने केलं. या सोहळ्यात डब्ल्यूडब्ल्यूईमधील जगप्रसिद्ध रेसलर जॉन सीनाने हजेरी लावली, सध्या त्याच्या एंट्रीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होत असताना जिमी किमेलने एका जुन्या ऑस्कर सोहळ्याची आठवण काढली, तेव्हा सूत्रसंचालक बोलत असताना पाठीमागून एक पुरूष नग्नावस्थेत धावत आला होता. जिमी किमेल हे बोलत असतानाच मंचावर जॉन सीना नग्नावस्थेत आला. पीके चित्रपटातील आमिर खानच्या लूकप्रमाणे जॉन सीना ऑस्कर अवॉर्डच्या मंचावर कपड्यांशिवाय दिसला. जॉनचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
ola electric scooter driving in sea viral
“भाऊपण ओला, स्कूटरपण Ola…” या ‘नेक्स्ट लेव्हल टेस्टिंग’चा Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO

वाचा ऑस्कर २०२४ मधील विजेत्यांची संपूर्ण यादी

२०२४ च्या ऑस्कर सोहळ्यात कॉस्च्युम डिझाईनसाठी पुरस्कार देण्यासाठी जॉन सीना कपडे न घालता फक्त हातात एक लिफाफा घेऊन पोहोचला होता. जॉन मंचावर येण्यापूर्वी जिमी किमेलने ऑस्करचा एक जुना इतिहास सांगितला, जेव्हा पुरस्कार सादर करताना एक नग्न माणूस मंचावर धावत आला होता. आज अगदी त्याचप्रमाणे एक व्यक्ती येईल, असं जिमीने उपस्थितांना म्हटलं आणि जॉन सीनाने मंचावर एंट्री घेतली.

“तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा…”, प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान; म्हणाला, “त्याच्या वडिलांनी…”

सुरुवातीला जॉन सीना कपड्यांशिवाय स्टेजवर यायला नकार देतो. तो जिमीला बॅकस्टेजवरून बोलावतो. तो म्हणतो की तो नग्नावस्थेत मंचावर येऊ शकत नाही, मग जिमी त्याला यायला सांगतो आणि जॉन बेस्ट कॉस्च्युमच्या लिफाफ्याने प्रायव्हेट पार्ट झाकून मंचावर येतो. जॉन सीनाला अशा लूकमध्ये पाहून सगळे जोरजोरात हसू लागतात. जॉन सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ‘पुअर थिंग्ज’ ची डिझायनर होली वॉडिंग्टनला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याची घोषणा करतो. त्यानंतर जॉन सीनावर पडदा टाकून त्याला झाकलं जातं आणि कॉस्च्युमचं महत्त्व हेच असल्याचं म्हटलं जातं.