scorecardresearch

Premium

Filmfare OTT Awards 2023: ओटीटी पुरस्कारांमध्येही आलिया भट्टने मारली बाजी; कोणत्या सीरिज व चित्रपटांना मिळाला पुरस्कार? जाणून घ्या

राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या आलिया भट्टने यंदाच्या ओटीटी पुरस्कारातही बाजी मारलेली आहे, तर मनोज बाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटालाही चांगलेच पुरस्कार मिळाले आहेत

filmfare-ott-awards
फोटो : सोशल मीडिया

Filmfare OTT Awards 2023: सध्या चित्रपटांच्या बरोबरीनेच ओटीटी प्लॅटफॉर्मनासुद्धा चांगलंच महत्त्व मिळायला लागलं आहे. बरेच चित्रपट, सीरिज या थेट ओटीटीवर प्रदर्शित होतात अन् प्रचंड लोकप्रिय होतात. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट तसेच सीरिजमधून नवीन चेहेरेदेखील समोर येतात. कित्येक बॉलिवूड कलाकारांनी तर ओटीटीमध्येही नशीब आजमावलं आहे. सैफ अली खान, मनोज बाजपेयी ते शाहिद कपूरपर्यंत कित्येक स्टार्स आता ओटीटीकडे वळू लागले आहेत.

आणखी वाचा : “चित्रपटसृष्टीत नेपोटीजम असूच शकत नाही कारण…” जावेद अख्तर यांचं विधान चर्चेत

shahrukh-khan-dadasaheb-phalke-award
“मला पुन्हा…”, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर शाहरुख खानने व्यक्त केल्या मनातील भावना
national award name indira gandhi and nargis
‘या’ कारणामुळे सरकारने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून वगळले इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव
shantanu mukherjee asha bhosle award singer musician pimpri
पिंपरी : पार्श्वगायक शांतनू मुखर्जी यांना ‘आशा भोसले’ पुरस्कार जाहीर
Filmfare Awards 2024 winners list Best Actor Ranbir Kapoor Alia Bhatt best film 12th Fail Filmfare Awards venue
Filmfare Awards 2024 : ‘ॲनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!

दरवर्षीप्रमाणे नुकताच फिल्मफेअरचा यंदाचा ओटीटी पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या आलिया भट्टने यंदाच्या ओटीटी पुरस्कारातही बाजी मारलेली आहे, तर मनोज बाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटालाही चांगलेच पुरस्कार मिळाले आहेत. फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार २०२३ मध्ये नेमके कोणाकोणाला पुरस्कार मिळाले ते आपण जाणून घेऊयात.

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार २०२३ :

उत्कृष्ट अभिनेता : मनोज बाजपेयी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
उत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (चित्रपट : डार्लिंग्स)
उत्कृष्ट पदार्पण : राजश्री देशपांडे (सीरिज : ट्रायल बाय फायर)
उत्कृष्ट दिग्दर्शक : अपूर्व सिंह कारकी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
उत्कृष्ट चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है
उत्कृष्ट दिग्दर्शन : विक्रमादित्य मोटवाने (सीरिज : जुबिली)
उत्कृष्ट सीरिज : स्कूप
उत्कृष्ट अभिनेता क्रिटीक्स : विजय वर्मा (दहाड)
उत्कृष्ट अभिनेत्री क्रिटीक्स : करिश्मा तन्ना (स्कूप) व सोनाक्षी सिन्हा (दहाड)
उत्कृष्ट दिग्दर्शक क्रिटीक्स : रणदीप झा (सीरिज : कोहरा)

याबरोबरच उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून शेफाली शाह यांना ‘डार्लिंग्स’ या चित्रपटासाठी व अमृता सुभाष हिला ‘द मिरर’ आणि ‘लस्ट स्टोरीज २’साठी पुरस्कार मिळाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alia bhatt wins best actress ott awards 2023 here is the full list of winners avn

First published on: 27-11-2023 at 09:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×