संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ सीरिजची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने मल्लिकाजान ही भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनीषाने ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये काम केल्याचा अनुभव सांगितला आहे.

‘हीरामंडी’बद्दल विचारणा करण्यासाठी जेव्हा संजय लीला भन्साळींनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा अभिनेत्री आपल्या नेपाळच्या घरी बागकाम करत होती. भन्साळींसारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल याची तिने अपेक्षा देखील केली नव्हती. ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत मनीषाने तिच्या ‘हीरामंडी’ सीरिजमधील अनुभवाबाबत आणि यामधील ओरल सेक्स सीनबाबत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “तुझ्याशिवाय शो अधुरा वाटेल…”, गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, म्हणाले…

मनीषा सांगते, “मी माझ्या नेपाळच्या घरात बागकाम करत असताना मला संजय लीला भन्साळींचा फोन आला होता. संजय मला म्हणाले होते की, मनीषा ही भूमिका तुझ्यासाठी अगदी उत्तम आहे. फक्त तू एकदा स्क्रिप्ट वाचून घे. हे ऐकून मी प्रचंड आनंदी झाले कारण, त्यांच्याबरोबर काम करण्याचं माझं स्वप्न कधी पूर्ण होईल असं मला वाटलंच नव्हतं. मी आशा सोडून दिल्या होत्या आणि अशातच त्यांनी माझ्याकडे भूमिकेसाठी विचारणा केली.”

मनीषाला पुढे शेखर सुमनबरोबरच्या ओरल सेक्स सीनबाबत तुला माहिती होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर अभिनेत्रीने “मला या सीनबाबत पूर्णपणे कल्पना नव्हती” असं सांगितलं. पुढे ती म्हणाली, “भन्साळी नेहमीच त्यांच्या कथेत काहीतरी आगळंवेगळं करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा रेकी सुरू होती तेव्हा माझ्यासाठी काही गोष्टी नवीन होत्या.”

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! सायली कुसुमसमोर देणार प्रेमाची कबुली पण, निर्माण होणार मोठा गैरसमज…

‘हीरामंडी’मधील सीनमध्ये शेखरचं पात्र मनीषाच्या म्हणजेच मल्लिकाजानच्या जवळ येतं. परंतु, तो प्रचंड नशेत असल्याने मल्लिकाजान कुठे बसलीये हे त्याला समजत नाही. या सीनबाबत शेखर सुमन एका मुलाखतीत म्हणाला होता की, “हा सीन एका नवाबासंदर्भात होता. जो मद्यधुंद अवस्थेत मल्लिकाजानला भेटण्यासाठी जातो आणि त्यानंतर तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण, शेवटच्या क्षणी भन्साळींनी या सीनमध्ये बदल केला. मद्यधुंद अवस्थेत असल्याने नवाब माघारी फिरून हवेतच हा ओरल सेक्स सीन करेल असं ठरलं.” याआधी अशाप्रकारचा सीन कधीच शूट करण्यात आलेला नाही असंही शेखरने सांगितलं.

दरम्यान, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘हीरामंडी’मध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा यांसारख्या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.