रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने जगभरात १०० कोटींची कमाई केली होती. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता अ‍ॅनिमल लवकरच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. अ‍ॅनिमलच्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

काही मीडिया रीपोर्टमधील माहितीनुसार ‘अ‍ॅनिमल’ जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटाच्या हक्कावरून मध्यंतरी वाद निर्माण झाला अन् याच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. साधारण कोणताही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ४५-६० दिवसांनी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. त्यानुसार जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अ‍ॅनिमल ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार हे ठरलेलं असतं.

chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
aajji bai jorat marathi play for kids based on artificial intelligence
आज्जीबाई जोरात
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

आणखी वाचा : “तो अगदी माझ्यासारखाच…” विवेक ओबेरॉयचं ‘अ‍ॅनिमल’ स्टार रणबीर कपूरबद्दलचं विधान चर्चेत

‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची लांबी ही ३ तास २१ मिनिटे असली तरी याआधी त्याची लांबी ३ तास ५० मिनिटे असल्याचे सांगितले जात होते. यानंतर चित्रपटात रणबीर आणि बॉबी देओल यांचा एक कीसिंग सीनदेखील असल्याची चर्चा होती. यामुळेच ‘अ‍ॅनिमल’चं हे अनकट व्हर्जन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल अशी चर्चाही रंगली होती. पण मध्यंतरी हाती आलेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्स असं कोणतंही व्हर्जन प्रदर्शित करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

आता मात्र याबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं अनकट व्हर्जन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. चित्रपटगृहात हा चित्रपट ३ तास २१ मिनिटे या लांबीचा होता, पण ओटीटीवर मात्र अधिक ८ मिनिटे वाढवून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान खुद्द संदीप रेड्डी वांगाने या गोष्टीची पुष्टी केली आहे.

या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून साऊथची सुपरस्टार रश्मिकाने बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले आहे. रश्मिका-रणबीरच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे, तर बॉबी देओलने या चित्रपटात साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेचेही कौतुक करण्यात आले आहे.