टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ संपलं की चाहत्यांना आतुरता असते ‘बिग बॉस ओटीटी’ची. ‘बिग बॉस ओटीटी’चे दोन पर्व चांगलेचं गाजले. गेल्यावर्षीचं ‘बिग बॉस ओटीटी’चं दुसरं पर्व लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं. या पर्वानं एक इतिहास रचला. तो म्हणजे पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या इतिहासात वाइल्ड कार्ड स्पर्धक एल्विश यादव विजेता झाला. आता लवकरच ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याची तारीख देखील समोर आली आहे.

माहितीनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्वाचा प्रीमियर पुढच्या महिन्यात म्हणजेच मेमध्ये होणार आहे. ‘इ-टाइम्स’च्या वृत्तानुसार, १५ मेपासून ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू होणार आहे. पण अजूनपर्यंत अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निर्माते अजूनही कलाकारांशी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभाग घेण्यासाठी संपर्क साधत आहेत.

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात

काही वृत्तानुसार, ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वासाठी दलजीत कौर, शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांना विचारण्यात आलं आहे. शहजादा आणि प्रतीक्षा काही दिवसांपूर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून बाहेर पडले. पण त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.

हेही वाचा – ‘भाई’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका अन्…; सागर देशमुखने सांगितला ‘तो’ गंभीर प्रसंग, म्हणाला…

‘टेली चक्कर’च्या वृत्तानुसार, ‘कुछ कुछ होता है’ फेम अभिनेत्री सना सईदला देखील ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी होण्यासाठी संपर्क केला होता. सनाने होकार दिला आहे. आता फक्त निर्मात्याच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.