Premium

बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘जवान’ने ओटीटीवरही रचला नवा विक्रम; किंग खानने मानले चाहत्यांचे आभार

ओटीटीवरही शाहरुख खानच्या ‘जवान’ने धुमाकूळ घातला आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचं एक्स्टेंडेड व्हर्जन प्रदर्शित करण्यात आलं

jawan-ott-records
फोटो : इंडियन एक्सप्रेस

२०२३ हे वर्षं शाहरुख खानसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. आधी ‘पठाण’ आणि नंतर ‘जवान’ या दोन्ही शाहरुख खानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसव जवळपास १००० कोटींहून अधिक कमाई केली. शाहरुखचा ‘जवान’ त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर इतिहास रचलाच पण आता ओटीटी विश्वातही शाहरुखच्या ‘जवान’ने रेकॉर्ड केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओटीटीवरही शाहरुख खानच्या ‘जवान’ने धुमाकूळ घातला आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचं एक्स्टेंडेड व्हर्जन प्रदर्शित करण्यात आलं. प्रदर्शित होताच या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता ‘जवान’ हा नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. खुद्द नेटफ्लिक्सने याची पुष्टी केली आहे.

आणखी वाचा : नेटफ्लिक्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे अनुराग कश्यपला आलेला दोनदा हार्ट अटॅक; दिग्दर्शकाचा मुलाखतीदरम्यान खुलासा

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेटफ्लिक्सने पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये नेटफ्लिक्स इंडियाने लिहिलं, “विक्रम राठोडने आता आपल्या मनावर आणि रेकॉर्डवर अधिराज्य गाजवलं आहे. ‘जवान’ हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे.” या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर भारतातून ३.७ मिलियन व्युज मिळाले आहेत.

मीडिया रीपोर्टनुसार शाहरुखचा हा चित्रपट तब्बल एक कोटी साठ लाख तास पाहण्यात आला आहे. ओटीटीवर या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता चाहत्यांनी शाहरुखचे कौतुक केले आहे. ‘एएनआय’शी संवाद साधतांना शाहरुखनेही त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. आता शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. याचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘डंकी’मध्ये प्रथमच शाहरुख खान व राजकुमार हिरानी एकत्र काम करणार आहेत. येत्या डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahrukh khans jawan becomes the most watched film on netflix avn

First published on: 22-11-2023 at 10:05 IST
Next Story
नेटफ्लिक्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे अनुराग कश्यपला आलेला दोनदा हार्ट अटॅक; दिग्दर्शकाचा मुलाखतीदरम्यान खुलासा