नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ‘पद्मावती’च्या टीमने प्रेक्षकांना खास भेट दिली. या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणच्या लूकचे दोन पोस्टर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आले. राजेशाही लूकमध्ये दीपिकाचे सौंदर्य त्यात अधिकच खुलून दिसतेय. त्यामुळे, या लूकमधील दीपिकाचे अधिकाधिक फोटो पाहण्यासाठी नेटिझन्स फार उत्सुक झाल्याचे चित्र आहे. अलाउद्दीन खिल्जी आणि राजा रावल रतन सिंग यांची भूमिका साकारणारे अभिनेते रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांचे लूक प्रतिक्षेत असतानाच दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत.
वाचा : कपड्यांवरुन महिलेची पारख करु नका, पाकिस्तानी अभिनेत्रीच्या मदतीला धावले कलाकार
चित्रपटाच्या त्या दोन पोस्टरव्यतिरीक्त पद्मावतीच्या भूमिकेतील दीपिकाचे इतरही काही फोटो व्हायरल होत आहेत. पारंपरिक पोशाख आणि दागिने घातलेल्या दीपिकाच्या जुळलेल्या भुवया पुन्हा एकदा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. एका जाहिरातीसाठी काढण्यात आलेले हे फोटो दीपिकाच्या फॅनपेजने शेअर केलेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या जाहिरातीसाठीच दीपिका पुन्हा एकदा राणी पद्मावतीच्या लूकमध्ये दिसली. त्यामुळे हे फोटो चित्रपटातील नसल्याचे स्पष्ट होते.
वाचा : बिकिनीतील फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला नेटिझन्सनी दिला पोट कमी करण्याचा सल्ला
‘पद्मावती’ चित्रपटातील रणवीर, दीपिका आणि शाहिद यांच्या ऐतिहासिक लूकसाठी रिंपल आणि हरप्रीत नरुला यांनी शाही पोशाख डिझाइन केले आहेत. आता रणवीर आणि शाहिदच्या लूककडेच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, शाहिदपेक्षा रणवीरचा लूक अधिक लक्षवेधी असल्याचे डिझायनर रिंपलने म्हटलेय.
https://www.instagram.com/p/BZWSp-8nWSP/