एका पाकिस्तानी अभिनेत्रीला मैत्रीणीचा न्यूड व्हिडीओ शूट केल्या प्रकरणी अटक केली आहे. गुरुवारी लाहोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मैत्रीणाचा कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीचे नाव खुशबू आहे. तिच्यासोबतच काशिफ खानवर एक थिएटरच्या चेजिंग रुपमध्ये गुपचूप कॅमेरा लावून न्यूड व्हिडीओ शूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे अश्लील व्हिडीओ शूट केल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला धमकी देण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खुशबूने थिएटरमध्ये काम करणाऱ्या काशिफ खानला एक लाख रुपये दिले होते. जेणे करुन तो चेंजिंग रुममध्ये कॅमेरा लावेल. या कॅमेराऱ्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करणाऱ्या ४ अभिनेत्रींचे न्यूड व्हिडीओ शूट केले आहेत. ते व्हिडीओ शूट केल्यानंतर त्यांचे व्हिडीओ नेटवर अपडलोड करण्याची धमकी दिली होती.
आणखी वाचा : ‘जेठालाल’ची मुलगी अडकणार लग्न बंधनात, जाणून घ्या कोण आहे जावई
अभिनेत्रींचे न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर थिएटरच्या मालकाने फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसीशी संपर्क साधला. थिएटर मालिका महमूदने सांगितले की, खुशबूला तिच्या मैत्रीणीचे वागणे पटत नव्हते. त्या दोघींमध्ये वाद सुरु होते. तिला नाटकामधून देखील बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे बदला घेण्यासाठी तिने असे केले असावे.