scorecardresearch

पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्रीचे भारतीय प्रेक्षकांबाबत मोठे विधान; म्हणाली, “माझ्या देशापेक्षा…”

पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सबिना फारूख तिच्या नकारात्मक पात्रांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, सबिना यांनी भारतीय प्रेक्षकांबाबत एक मोठं विधान केलं आहे.

Pakistani TV Actress Sabina Farooq
पाकिस्तानी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सबिना फारूख

पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सबिना फारूख ही कोणत्याही वेगळ्या ओळखीवर अवलंबून नाही. पाकिस्तानी टीव्ही सीरियल ‘तेरे बिना’मधील हया या व्यक्तिरेखेद्वारे सबिना फारूखने आपली खास ओळख निर्माण केली आहे. एवढेच नाही तर छोट्या पडद्यावर नकारात्मक भूमिका कशा साकारायच्या हे सबीनाने दाखवून दिले आहे. दरम्यान, सबिना फारुखने तिच्या भूमिकेबद्दल भारतीय प्रेक्षकांबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- Video : खासदार राघव चड्ढा यांचे नाव घेताच लाजली परिणीती चोप्रा, गालातल्या गालात हसतानाचा व्हिडीओ समोर

पाकिस्तानी टीव्ही मालिका आणि स्टार कास्टची क्रेझ भारतात खूप वाढल्याचे गेल्या काही काळापासून दिसून येत आहे. मग ती पाक टीव्ही मालिका ‘मेरे हमसफर’ असो किंवा तेरे बिन. दरम्यान, ‘तेरे बिन’ स्टारर सबिना फारूकने अलीकडे बीबीसी न्यूजला एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये सबीनाने तिच्या हया या पात्राबद्दल भारतातील लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल सांगितले. सबिना फारूक यांनी सांगितले की, ‘भारतातून आलेल्या लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल मी जितके बोलेन तितके कमी आहे.

हेही वाचा- प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”

भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आणि जबरदस्त आहेत. भारतातील लोक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात ते ऐकून आणि जाणून खूप बरे वाटते. ‘माझ्या पात्राला ज्या प्रकारे भारताकडून प्रेम मिळतं, ते पाकिस्तानकडून मिळत नाही. जे माझ्यासाठी खूपच आश्चर्यकारक आहे. नकारात्मक भूमिकेमुळे इथले लोक माझ्याबद्दल खूप चुकीचे लिहितात आणि वाईटही बोलतात. अशी खंतही सबिना फारुखने व्यक्त केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 10:00 IST

संबंधित बातम्या