‘बिग बॉस मराठी पर्व २’च्या घरातील सर्वात जास्त चर्चेत असणार आणि सर्वात स्ट्राँग स्पर्धक म्हणून पराग कान्हेरे ओळखला जात होता. परागने घरातील स्पर्धकांना त्याचा जेवणाने खूश केले होते तर प्रेक्षकांचे त्याच्या वर्तवणुकीमुळे मनोरंजन केले होते. परंतु एका टास्कदरम्यान परागने नेहासोबत गैरवर्तन केल्याने त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी परागने सोशल मीडियावर ‘येतोय मी. आता सगळ्यांचा हिशोब होणार. तू, तो आणि ती पण जाणार’ असे लिहित एक पोस्ट लिहिली होती. त्याच्या या पोस्टवरुन पराग बिग बॉसच्या घरात परत येणार असल्याचे म्हटले जात होते. पण परागने नुकताच केलेल्या एका पोस्टवरुन सर्वांचा गैरसमज दूर केला आहे. तो बिग बॉसच्या घरात परतणार नसून त्याची नवी वेब सीरिज येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वेब सीरिज किचनसूत्रा या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parag kanhere is coming back with web series avb
First published on: 03-08-2019 at 13:56 IST