scorecardresearch

‘गाडी वाला आया देखो कचरा निकाल’, न्यूड फोटोमुळे परिणिती झाली ट्रोल

परिणितीने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी हे फोटोशूट केले आहे.

‘गाडी वाला आया देखो कचरा निकाल’, न्यूड फोटोमुळे परिणिती झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा ‘सायना’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिचा हा चित्रपट चर्चेत होता. आता परिणितीच्या एका न्यूड फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. या फोटोमुळे तिला ट्रोल देखील करण्यात आले आहे.

नुकताच परिणितीने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी एक फोटोशूट केले आहे. या कॅलेंडरसाठी अभिनेत्री क्रिती सेनॉन, कियारी अडवाणी यांनी देखील बोल्ड फोटोशूट केले आहे. पण परिणितीच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डब्बू रत्नानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर परिणीतीचा फोटो शेअर केला आहे.

परिणितीचा हा फोटोपाहून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. एका यूजरने ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हा तर कचरा आहे. लवकर फेकून द्या’ असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी परिणितीचा ‘सायना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. 2012 सालच्या ऑलिंपीक स्पर्धांमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक पटकावलं आहे. तसेच आपल्या उत्कृष्ट खेळाने अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली आणि अनेक नवे विक्रम तिने गाठले आहेत. सायनाच्या याच कामगिरीची झलक या चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parineeti chopra gets troll owing of nude photo shoot of dabboo ratnani avb

ताज्या बातम्या