‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ “पाऊस उन्हाचा वैरी” हा पाऊस गीतांचा अल्बम घेऊन येत असून यातील गीते आणि संगीत युवा संगीतकार ऋग्वेद देशपांडेचे आहे. संगीत संयोजन वरद खरे यांनी केले असून ठाण्यातील आर.डी. म्युझिक रुम या स्टुडिओत या गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले आहे. या अल्बमचे प्रकाशन प्रसिध्द कवी अभिनेता सौमित्र उर्फ किशोर कदम यांच्या हस्ते वांद्रे येथील ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’च्या कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी युनिव्हर्सलचे मंदार गुप्ते, राजन प्रभू, संगीतकार ऋग्वेद देशपांडे, संगीत संयोजक वरद खरे, मंगेश बोरगांवकर, डॉ. नेहा राजपाल, सावनी – रविंद्र, मनोज देसाई, अनघा ढोमसे, रुपाली मोघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या अल्बम मध्ये एकूण सात गायकांनी प्रत्येकी एक अशी गाणी गायली असल्यामुळे रसिकांना प्रत्येक गाण्यातून एक वेगळा आनंद अनुभवता येणार आहे. मंगेश बोरगांवकर, डॉ. नेहा राजपाल, सावनी – रविंद्र, मनोज देसाई, अनघा ढोमसे, रुपाली मोघे आणि या अल्बमचे संगीत दिग्दर्शक ऋग्वेद देशपांडे अशा सात गायकांनी पावसातल्या वेगवेगळ्या अवस्था आपल्या गाण्यांतून सादर केल्या आहेत.
या अल्बमचे वेगळेपण त्याच्या शिर्षकामधूनच जाणवते. “पाऊस उन्हाचा वैरी”, कवी ऋग्वेद यांच्या “ती,मी आणि ऱिहदम” या काव्यसंग्रहातील ही कविता असून या अल्बमच्या निमित्ताने गाण्याच्या स्वरुपात ती आपणापर्यंत येत आहे. पावसाळी वातावरणातील मानसिकतेशी संदर्भ जोडण्याचा प्रयत्न ऋग्वेद देशपांडे यांनी त्यांच्या शब्द आणि संगीतातून केला आहे. प्रत्येक संगीतप्रेमीला हा अल्बम एक वेगळा अनुभव देऊन जाईल यात काहीच वाद नाही.

८३व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेते चौथ्यांदा होणार बाबा, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाले, “यावेळी खूप…”