आपल्या दमदार कॉमेडीने सर्वांनाच पोट धरून हसायला लावणारी कॉमेडियन भारती सिंहनं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नन्सीची बातमी सर्वांना सोशल मीडियावरून दिली होती. भारती एप्रिल २०२२ मध्ये बाळाला जन्म देणार आहे. सध्या भारती स्वतःची प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे आणि स्वतःची पूर्ण काळजी घेत आहे.

भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया सध्या त्यांची बाकी राहिलेली सर्व काम पूर्ण करत आहे. कारण जेव्हा त्यांच्या बाळाचा जन्म होईल तेव्हा ते आपला पूर्ण वेळ आपल्या बाळाला देऊ शकतील. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून ती सातत्यानं फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसते. ती जिथे जाईल तिथे फोटोग्राफर्स तिच्या मागे पोहोचतात आणि तिला तिच्या प्रेग्नन्सीबाबत प्रश्न विचारताना दिसतात. भारतीचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती फोटोग्राफर्सचे प्रश्न ऐकून त्यांना हात जोडताना दिसत आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर भारतीला, ‘तुला मुलगी हवी आहे का मुलगा?’ असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावर ती त्यांना, ‘मला मुलगीच हवी आहे’ असं सांगते. याशिवाय त्यांनी तिला तिच्या प्रेग्नन्सीबाबत इतरही काही प्रश्न विचारले जे ऐकल्यावर भारती त्यांना म्हणते, ‘आई होणं चुकीचं आहे का?’ यानंतर ती सर्वांना हात जोडून नमस्कार करते आणि कारमध्ये बसून मस्करीच्या सुरात सर्वांना म्हणते, ‘मलाच मत द्या’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये भारती पुढे म्हणते, ‘मला माझ्या प्रेग्नन्सीची बातमी स्वतः सर्वांना द्यायची होती. पण तुम्ही सर्वांनी बातम्या छापून माझा सर्व सस्पेन्स संपवून टाकला. त्यामुळे आता सर्वांनी मला डिलिव्हरीसाठी ५०-५० हजार द्या. मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे हे सर्वांना कळवलं जाईल. त्यावेळी सर्वजण ५०-५० हजार घेऊन तिथे या.’ अर्थात भारती सर्वांची मस्करी करत होती. पण भारतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.