बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने जेव्हा पासून लग्न केले त्या दिवसापासून ती चर्चेत आली आहे. तिने अचानक लग्न का केले असेल? ती प्रेग्नेंट असेल का? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात होते. पण या प्रश्नांचे निरसन होण्याआधी तिच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रिया सेन फारच सुंदर दिसते. दिल्लीत झालेल्या या रिसेप्शनला जवळचे मित्र-मैत्रिण आणि कुटुंबीय उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लीला पॅलेसमध्ये ठेवण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये रिया दोन आऊटफिटमध्ये दिसली. सुरूवातीला तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर नंतर ती काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये होती. हे दोन्ही पेहराव तिच्यावर खुलून दिसत होते.

रिसेप्शनमध्ये रियाची आई मूनमून सेन, बहीण रायमा सेन आणि शिवमचे कुटुंबीयही उपस्थित होते.

रिया- शिवम यांनी पुण्यात अगदी जवळच्या मित्र- मैत्रिण आणि कुटुंबीयांमध्ये लग्न केले. ते गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.

शिवम अनेकदा त्याच्या इन्स्टाग्रामवर रियासोबतचे फोटो शेअर करायचा. पण रियाने कधीही ते नात्यात असल्याचे मान्य केले नव्हते.

रिया सध्या एकता कपूरच्या ‘रागिणी एमएमएस 2.2’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या वेब सीरिजआधी तिने ‘लोनली गर्ल’ या लघुपटातही काम केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photos of actress riya sens wedding reception goes viral
First published on: 20-09-2017 at 21:34 IST