झी मराठीवरील ‘अंग्गबाई सूनबाई’ या मालिके पाठोपाठ आता स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेतील एका दृश्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी मुख्य भूमिकेत आहे. तो शुभमची भूमिका साकारत आहे. शुभमने सध्या एका पाककला स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब तेथे पोहोचले आहे. याच स्पर्धेतील एक स्पर्धक ‘सँडी’ हा तृतीयपंथीय दाखवला आहे. सँडी ही भूमिका अभिनेता अजिंक्य पितळेने साकारली आहे. स्पर्धा सुरु असताना सँडी आणि शुभमची आई म्हणजेच जीजी अक्का यांच्यामध्ये झालेल्या संवादावरुन LGBTQIA+ कम्युनिटीने आक्षेप घेतला आहे.

आणखी वाचा : ४६ वर्षांच्या एकता कपूरने सांगितले होते लग्न न करण्यामागचे कारण

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील स्पर्धा सुरु असताना जीजी अक्का सँडीला अनेक गोष्टींविषयी बोलताना दिसतात. जीजी अक्का सँडीला गळ्यातले, बांगड्या ही ज्वेलरी बहिण किंवा आईला देण्यास सांगतात. तसेच त्याला जीममध्ये जाण्याचा देखील सल्ला देतात. सँडी आणि जीजी अक्का यांच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘Yes, we exist india’ या इन्स्टाग्राम पेजने याबाबत माहिती दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका हिंदीमधील अतिशय लोकप्रिय मालिक ‘दिया और बाती हम’चा रिमेक आहे. या मालिकेत हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकर हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी ‘अंग्गबाई सूनबाई’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.