आगमी लोकसभा निवडणुकांच्या काळात बहुप्रतिक्षित ठरत असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये मोदींच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना दाखविण्यात आल्या आहेत. ट्रेलरनंतर चित्रपटातलं ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यातून भारत माता आणि जनतेचा संवाद दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मेरी धरती मुझसे पुछ रही…’ या ओळीने सुरु झालेल्या गाण्यामध्ये माझं कर्ज कधी फेडणार असा प्रश्न धरती मातेने विचारला आहे. त्यासोबतच देशातील ग्रामीण भागात राहणारी जनता कशा प्रकारे मातीत आपला घाम गाळतात त्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘सौगंध मुझे इस मिट्टी की ये देश नहीं झुकने दूंगा’ या गाण्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी देशवासियांच्या सुरक्षेची शपथ घेतली आहे.

‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ या गाण्याला गायक सुखविंदर सिंह आणि शशि सुमन यांचा सुमधूर आवाज लाभला आहे.तर शशि-खुशी यांनी संगीत दिले. प्रसून जोशी यांनी गाण्याचे लेखन केले असून मेघदीप बोस यांनी गाण्याची निर्मिती केली.

दरम्यान, या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ऑबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर त्यांच्या वडीलांच्या भूमिकेत मनोज जोशी दिसणार आहेत. यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात दर्शन कुमार, बोमण इराणी, प्रशांत नारायणन, जरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यतीन कार्येकर, राजेंद्र गुप्ता आणि अक्षत आर सलूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ओमंग कुमार द्वारा दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती संदीप एससिंह, सुरेश आणि आनंद पंडित यांची आहे. चित्रपटाच्या कथेचे लेखण संदीप यांचे असून चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi biopic new song saugandh mujheiss mitti ki out
First published on: 24-03-2019 at 11:09 IST