‘हसिना मान जायेगी’ आणि ‘विरासत’ चित्रपटातील पूजा बत्रा ही अभिनेत्री आठवते का तुम्हाला? अमेरिकेत भरत असलेल्या ‘मिस दुनिया’ सौंदर्यवती स्पर्धेच्या सल्लागार समितीवर पूजा बत्राची नेमणूक झाली आहे. १९९३ साली ‘मिस इंडिया’चा किताब जिंकलेल्या पूजाने नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. स्त्रीला तिची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रत्येक स्त्रीचे सक्षम होणे गरजेचे असल्याचे सांगत आपण प्राप्त केलेल्या यशासाठी पूजाने मनोरंजन क्षेत्राचे आभार मानले आहेत. सौंदर्यवती स्पर्धेच्या माध्यमातून तरूण मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी मदत होत असल्याने अशा प्रकारच्या स्पर्धेचा भाग होऊन एक प्रकारे आपण त्यांना सहकार्य करत असल्याची भावना तिने व्यक्त केली. या स्पर्धेचा भाग होण्याची संधी मिळाल्याने पूजा कमालीची उत्सुक झाली आहे. स्पर्धेत १३० देशांच्या सौंदर्यवती सहभागी होणार असून, विजयी सौंदर्यवतींना दोन लाख ५० हजार डॉलर्सची रोख बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील मनोरंजन आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडू शकत असल्याचे पूजाने म्हटले. प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सोहळा लास व्हेगास येथे डिसेंबर २०१५ मध्ये होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja batra joins beauty pageants advisory panel
First published on: 24-04-2015 at 01:51 IST