गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चा कोणत्या चित्रपटाची झाली असेल तर तो म्हणजे ‘पद्मावत’. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटावरून देशभरात वातावरण तापलं असतानाच त्यावर अनेकांनी मतं व्यक्त केली. सोशल मीडियावरही याच चित्रपटाची जोरदार चर्चा असून दररोज काही घडामोडी पाहायला मिळतात. अशातच ड्रामा क्वीन पूनम पांडेसुद्धा मागे राहिली नाही. तिनेही ट्विटरवर एकंदरीत वादावर तिचं मत व्यक्त केलं. मात्र, तिच्या या मतावर ट्विपल्सनी जबरदस्त फिरकी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील काही भागात करणी सेनेकडून या चित्रपटाच्या विरोधात तीव्र आंदोलने झाली. काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळसुद्धा करण्यात आले. ज्या सिनेमागृहांमध्ये पद्मावत प्रदर्शित होणार, तिथं तोडफोड करण्याचा इशारा करणी सेनेने दिल्याने प्रेक्षकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे, ”पद्मावत’ पाहायला जाणं हे ‘खतरों के खिलाडी’सारख्या टीव्ही सीरिजमध्ये एखादं टास्क असलं पाहिजे,’ असं ट्विट पूनमने केलं. त्यावरून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam pandey tweet over padmaavat gets hilarious reactions on social media
First published on: 29-01-2018 at 19:04 IST