छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे नवऱ्याला’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची भावूक झाल्या. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेच्या संपूर्ण टीमसोबतचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. या मालिकेचा शेवटचा एपिसोड १७ ऑक्टोबर रोजी प्रसारित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री सायली देवधरनेही भावनिक पोस्ट लिहिली. ‘शेवट हा वाईट नसतो. काहीतरी नवीन सुरुवात होणार याचा तो संकेत असतो. शरयू या भूमिकेला तुमच्याकडून मिळालेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. नवीन भूमिकेत, नवीन आशेसह पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईन’, अशा शब्दांत सायलीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

आणखी वाचा : निवेदिता सराफ यांनाही येतो का बबड्याचा राग?

भालेराव कुटुंबाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि प्रभाकर, प्रशांत, रवी, उदय ही चार भावंडं सगळ्यांना आपलीशी वाटू लागली होती. लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांची आणि भालेराव कुटुंबाची भेट झाली नव्हती, पण अनलॉकदरम्यान मालिकेचं चित्रीकरण पुन्हा सुरू झाल्यानंतर आता ती लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular marathi tv show navari mile navryala to go off air ssv
First published on: 07-10-2020 at 16:40 IST