लॉकडाउनमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव ‘पोरगं मजेतय’ असे आहे. आता लॉकडाउनमध्येच या चित्रपटाचे चित्रीकरणसुद्धा पूर्ण झाले आहे. लॉकडाउनमध्ये चित्रीकरण पूर्ण करणारा हा ‘पोरगं मजेतय’ पहिला चित्रपट ठरला आहे.

‘पोरगं मजेतय’ या चित्रपटाच्या चित्रीकरण प्रक्रियेबद्दल दिग्दर्शक मकरंद माने यांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी, करोना काळात शूटिंग करणं खूप धोक्याचं आहे हे अगदीच मान्य आहे. पण जर का आपण सर्वांनी मिळून स्वतःची तसेच आजूबाजूला असणाऱ्या सर्व व्यक्तींची योग्य ती काळजी घेतली तर कोणाला कसलाही त्रास न होता आपण वेळेत सर्व काम करू शकतो हा आत्मविश्वास पोरगं मजेतयच्या चित्रीकरणा दरम्यान निश्चितच आम्हाला मिळाला असे म्हटले

दरम्यान सर्व टीम ची काळजी तर घ्यायची होतीच शिवाय ज्या गावात चित्रीकरण करतोय ते गाव, आजूबाजूचा परिसर सुरक्षित राहिला पाहिजे हे जास्त महत्वाचे होत. कोणाला कसलाही आजार न होता आम्ही संपूर्ण शूटिंग अगदी नियमपूर्वक पार पाडले असे पुढे ते म्हणाले. दिग्दर्शक मकरंद माने यांनी यापूर्वी यंग्राड, रिंगण आणि कागर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्या ‘पोरगं मजतेय’ या चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.