करोना विषाणूमुळे जगभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. अगदी माजी पॉर्नस्टार मिया खलिफा देखील. करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे तिला आपले लग्न पुढे ढकलावे लागले आहे. लग्नाची तारीख रद्द झाल्यामुळे मिया सध्या दु:खी आहे. तिने आपले दु:ख इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यामातून व्यक्त केले आहे.

काय म्हणाली मिया?

मिया खलिफा गेल्या वर्षभरापासून अमेरिकन लेखक रॉबर्ट सँडबर्गला डेट करत आहे. येत्या जून महिन्यात ती रॉबर्टसोबत लग्न करणार होती. त्यांनी आपल्या लग्नाची संपूर्ण तयारी देखील केली होती. मात्र करोना विषाणूने त्यांच्या योजनेत खंड पाडला. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चिचीत कालावधीसाठी त्यांना आपले लग्न पुढे ढकलावे लागले आहे. परिणामी मिया प्रचंड दु:खी आहे.

“रॉबर्टशी लग्न होण्याअगोदर जर हे जग संपलं तर हे १२ कपडे माझ्यासोबत क्लोसेटमध्ये ठेवा. हे कपडे मी माझ्या लग्नात घालणार होती.” अशा आशयाची इन्स्टा पोस्ट लिहून मियाने आपले दु:ख व्यक्त केलं आहे.

मियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी तर तिच्यासाठी दु:ख देखील व्यक्त केले आहे. मियाच्या लग्नाव्यतिरिक्त अनेक मोठे चित्रपट आणि आयपीएल, ऑलंपिक, एनबिए, WWE रेसलमेनिया यांसारख्या अनेक मोठ्या स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.