आपल्या आवडत्या चाहत्याला भेटण्यासाठी चाहत्यांची सतत धडपड सुरुच असते. त्यासाठी चाहते कधी काय करतीय याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये साहो चित्रपटाचा बोर्ड लावताना प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू झाला होता. आता तेलंगणा येथे देखील असेच काहीसे घडले आहे. प्रभासचा चाहता मोबाईल टॉवर वर चढला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार प्रभासचा चाहता मोबाईल फोनच्या टॉवर वर चढला आहे आणि तेथून उडी मारून जीव देण्याची धमकी देत आहे. दरम्यान चाहत्याने प्रभासची भेट घालून द्या नाहीतर मोबाईल टॉवरवरुन उडी मारून जीव देईन अशी अट घातली आहे. घटना स्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि नागरिकांनी चाहत्याला खाली उतरण्यास विनंती केली आहे. मात्र चाहत्याने खाली उतरण्यास नकार दिला आहे. त्यानंतर काय घडले हे अद्याप समोर आलेले नाही.

यापूर्वी साहो चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी आंध्र प्रदेशमध्ये चित्रपटाचा बोर्ड चित्रपटगृहाबाहेर लावताना एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. समिक्षकांनी दिलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ३५० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या १० दिवसांमध्ये ४०० कोटींची कमाई केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘साहो’ चित्रपटात प्रभास व श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सुजीतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘साहो’ने ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ व ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या दोन चित्रपटांना पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकले होते.