टॉलिवूडमधून बॉलिवूडपर्यंत प्रवास करत यशस्वी झालेल्या कलाकारांमध्ये आवर्जून घेतले जाणारे नाव म्हणजे प्रभास. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे प्रभासच्या लोकप्रियतेने शिखर गाठले. चित्रपटाच्या यशानंतर प्रभासनेही त्याचे मानधन जवळजवळ ४०० टक्कांनी वाढवले. या अभिनेत्याची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. आज त्याचा ४० वा वाढदिवस. त्याच निमित्त जाणून घेऊयात त्याच्या एकूण संपत्तीबद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभास सुमारे १९८ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. हैदराबादमधील जुबली हिल्स या उच्चभ्रू वस्तीत त्याचा आलिशान बंगला आहे. २०१४ मध्ये त्याने चित्रपट नगरातही आणखी एक बंगला खरेदी केला होता. इतर दाक्षिणात्य सुपरस्टार्ससारखंच प्रभासलाही महागड्या गाड्यांची आवड आहे. तब्बल आठ कोटी रुपये किंमत असलेली रोल्स रॉयल फँटम कार त्याच्याजवळ आहे. अनेकदा त्याला या कारमधून तो फिरताना दिसतो. या प्रत्येक कारची किंमत एक ते दोन कोटींच्या घरात आहे.

‘बाहुबली’च्या यशानंतर त्याने बऱ्याच शूज ब्रँड कंपन्यांशी जाहिरातीचा करार केला होता. या प्रत्येक ब्रँडसाठी त्याने सुमारे दोन कोटी रुपये इतके मानधन घेतले होते. सिनेमाबरोबरच अनेक ठिकाणी केलेली गुंतवणूक आणि जाहिराती हा प्रभासच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे. बाहुबली सिनेमानंतर प्रभासच्या संपत्तीमध्ये ६५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जाते. बाहुबली सिनेमासाठी त्याने २५ कोटींचे मानधन घेतले होते.

प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ ला चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील, सुर्यनारायण राजू चित्रपट निर्माते आहेत. तर काका कृष्णम राजू प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते आहेत. त्याचे शालेय शिक्षण भीमावरमच्या डीएनआर स्कूलमध्ये झाले आणि हैदराबादच्या श्रीचैतन्य कॉलेजमधून त्याने बी.टेक.ची पदवी घेतली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas net worth 2019 total property and cars scsg
First published on: 23-10-2019 at 10:08 IST