अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मावस भावाने गोळी झाडू आत्महत्या केली. नितीन चौहान असे त्यांचे नाव असून त्याच्याजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडल्या आहेत. शिमला शहराचे उपनगर न्यू शिमला येथे नितीन चौहान राहत होते.  न्यू शिमल्यातील सेक्टर-२ येथे कार पार्किंगमध्ये गाडी उभी करून नितीन यांनी स्वत:ला गोळी मारली. घटनास्थळी पोलिस पोहचल्यावर केलेल्या तपासात ते बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचे मावस भाऊ असल्याचे निष्पन्न झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठ्यांमध्ये नितीनने सासरच्या मंडळींनी त्यांचा खूप छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘माझ्या पत्नीच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. माझ्यावर खोटे आरोप करून मला खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवले गेले आहे’. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठ्यांची सत्यता पडताळण्यासाठी त्यांना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

आत्महत्या करण्यासाठी वापरलेले गावठी पिस्तुल नितीन यांच्याकडे कसे आले याचा शोधही यावेळी घेतला जात आहे. त्यांच्या सासरच्या मंडळींवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘त्या दिवशी नितीनची आई त्याच्या रुममध्ये चहा घेऊन आली तेव्हा तो तेथे नव्हता. आईने घरामध्ये शोधले परंतु तो कुठेच दिसला नाही. अखेर बातमी आली की, त्यांच्या घरापाशी असणाऱ्या पार्किंगमध्ये नितीनने गोळी मारून आत्महत्या केली. गोळी डोक्यातून आरपार गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सुसाईड नोटमध्ये नक्की लिहिले तरी काय?

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये नितिनने सांगितले की, ‘सासरचे लोक मला माझ्या मुलांना भेटू देत नाही. माझ्या मुलांवर मी खूप प्रेम करतो. न्यायालयात माझ्यावर खोटे खटले दाखल करून ते माझा छळ करत आहेत. माझ्या आत्महत्येला दुसरे कोणी नाही तर केवळ सासरचेच लोक जबाबदार आहेत.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zinta cousion brother commits suicide
First published on: 03-12-2016 at 19:16 IST