बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणजेच प्रीति झिंटा हिने आपल्या दमदार अभिनयाने आणि परफॉर्मन्सने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या गालावरच्या खळीचे तर लाखो दिवाने आहेत. ‘वीर झारा’, ‘सलाम नमस्ते’, ‘कल हो ना हो’ सारख्या चित्रपटांतून भेटीला येणारी प्रीति झिंटा सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असली तरीही तिच्या चाहत्यांचा आकडा मात्र काही कमी झालेला नाही. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून कोणत्याची गॉड फादरशिवाय प्रीतिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण तुम्हाला माहितेय का, प्रीति एक नाही, दोन नाही तर तब्बल ३४ मुलींची आई आहे. होय, हे वाचून तुम्ही ही हैराण व्हाल.
अभिनेत्री प्रीति झिंटाने ३४ अनाथ मुलींना दत्तक घेतलंय. प्रीति झिंटाने लग्नापुर्वीच २००९ साली या ३४ मुलींचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. उत्तराखंडाच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलमधील ३४ मुली तिने दत्तक घेतल्या. वर्षातून दोन वेळा प्रीति झिंटा ही दत्तक घेतलेल्या ३४ मुलींना भेटण्यासाठी जात असते. प्रीति झिंटाचं हे कार्य पाहून आधीच तिच्या खळीमुळे प्रेमात पडलेल्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
वयाच्या ४६ व्या वर्षी केलं गुपचूप लग्न
प्रीति झिंटा सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात बरीच रमलीय. लग्नानंतर ती बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून थोडा दुरावाच ठेवताना दिसून आली. प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षे लहान अमेरिकन सिटीझन जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केलं. फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजल्समध्ये अगदी खाजगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. प्रीति आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या वेडिंगचे फोटो जवळपास 6 महिन्यांनी मीडियात आले होते. त्यावेळी प्रीति ४६ वर्षाची होती.
View this post on Instagram
प्रीति झिंटा लग्नानंतर बॉलिवूडमध्ये कमी पण क्रिकेटच्या मैदानावर जास्त दिसून आली. ‘भइया जी सुपरहिट’ हा प्रीतिचा शेवटचा चित्रपट आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर ती क्रिकेटच्या मैदानावर आईपीएलमध्ये तिची क्रिकेट टीम किंग्स इलेव्हन पंजाबचा उत्साह वाढवताना दिसून आली.