राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी ३मे ला आयोजित करण्यात आलेल्या ‘६१व्या राष्ट्रीय चित्रपट’ पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारासह माहितीपट आणि चित्रपट विभागात असे एकूण ८०पेक्षा जास्त पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसारित केलेल्या एका पत्र जाहीर केले आहे. २०१३ वर्षाकरिताचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रसिद्ध गीतकार, निर्देशक, पटकथा लेखक, निर्माता आणि आणि कवी गुलजार यांना विज्ञान भवनात आयोजित करण्यात येणा-या एका समारंभात देण्यात येईल. तसेच, राष्ट्रपतींच्या हस्ते माहितीपट विभागात एकूण ४१ पुरस्कार तर, चित्रपट विभागात ४० पुरस्कार दिले जाणार आहेत. चित्रपटाच्या उत्कृष्ट लेखनाकरिताही तीन पुरस्कार दिले जातील.