स्टार प्रवाह वाहिनीवर ५ फेब्रवारीपासून ‘प्रीतीपरी तुजवरी’ ही नवी मालिका सुरू होत आहे. दर सोमवार ते शनिवार या दिवशी सायंकाळी सात वाजता या मालिकेचे प्रसारण होणार आहे. जुळ्या बहिणी आणि त्यांच्या आयुष्यात आलेला एक मुलगा, त्यांच्यातील प्रेम मालिकेतून सादर करण्यात येणार आहे.
मालिकेत प्रीती आणि परी या दोन जुळ्या बहिणी असून दोघींचेही स्वभाव पूर्ण भिन्न आहेत. प्रीती ही साधीभोळी तर परी एकदम आधुनिक. दिसायला सारख्या असणाऱ्या या जुळ्या बहिणींच्या आयुष्यात सिद्धार्थ नावाचा एक मुलगा येतो. दोघींच्या चेहऱ्यातील सारखेपणामुळे आपण नक्की कोणाच्या प्रेमात पडलो आहोत, याचा त्यालाही प्रश्न पडतो. यातून ज्या काही गमतीजमती आणि धमाल घडत जाते ती या ‘प्रीतीपरी तुजवरी’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.