डॉ. नीलेश साबळेला काही दिवस विश्रांती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नमस्कार मंडळी! कसे आहात सगळे?, असा प्रश्न विचारत प्रेक्षकांना ‘हसायलाच पाहिजे’चा आग्रह धरणारा आणि आपल्या शोच्या माध्यमातून पोट धरून हसायला लावणारा डॉ. नीलेश साबळे सध्या काही दिवस ‘चला हवा येऊ द्या’पासून दूर राहणार आहे. त्याची प्रकृती बिघडली असल्या कारणाने कमीतकमी महिनाभर तरी नीलेशला चित्रीकरणात सहभाग घेता येणार नसल्याने काही भागांपुरती शोचे सूत्रसंचलन अभिनेता प्रियदर्शन जाधवकडे देण्यात आले आहे.

गेले तीन वर्षे सातत्याने प्रेक्षकांसमोर अत्यंत रंजक पद्धतीने ‘चला हवा येऊ द्या’ हा शो डॉ. नीलेश साबळे आणि त्यांची टीम सादर करत आहे. या तीन वर्षांत पहिल्यांदाच काही भागांपुरता का होईना नीलेश शोपासून दूर असणार आहे. गेले काही दिवस त्याची प्रकृती बिघडलेली होती. त्याचे उपचार सुरू असले तरी डॉक्टरांनी काही आठवडे त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितली आहे. ‘टाईमपास २’ फे म प्रियदर्शन जाधव स्वत: विनोदी अभिनेता, लेखक असल्याने त्याच्यावर काही भागांपुरते या शोचे सूत्रसंचलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  ‘चला हवा येऊ द्या’ हा शो पूर्णपणे नीलेशचा आहे. सध्या त्याची प्रकृती बरी नसल्याने मला काही भाग करण्यासाठी विचारणा झाली. काही भागांसाठी मी काम करणार असल्याने अजिबात दडपण घेणार नाही. पण मुळात मी सूत्रसंचलन फारसे केलेले नसल्याने प्रत्येक भाग चांगला होईल ही जबाबदारी असल्याचे प्रियदर्शनने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyadarshan jadhav will do chala hawa yeu dya anchoring
First published on: 03-02-2017 at 02:11 IST