हॉलिवूड पदार्पणापासून ते फोर्ब्स इंडिया टॉप १०० सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळण्यापर्यंत अशा एक ना अनेक कारणांमुळे प्रियांका चोप्राचा यावर्षाचा शेवट गोड होईल यात शंका नाही. सध्या ही ‘देसी गर्ल’ भारतात परतली आहे.

वाचा : आईच्या भूमिका साकारण्यास माधुरीचा नकार?

नुकतच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रियांकाने दिल्लीला गेलो होती. या कार्यक्रमात आपली बाजू स्पष्टपणे मांडण्याची संधी प्रियांकाने सोडली नाही. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाला मिळणाऱ्या मानधनावरून बरीच चर्चा रंगली होती. पाच मिनिटांसाठी ती पाच कोटी रुपये मानधन घेते असे म्हटले जात होते. या चर्चांवर प्रियांकाने आता सडेतोड उत्तर दिले आहे असे म्हणायला हवे. ती म्हणाली की, ‘यशाच्या या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप कष्ट केले आहेत. मी काही चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलगी नाही. माझ्या पालकांनी मला हवं ते दिलं. पण, हे यश मिळवण्यासाठी मी अपार कष्ट केले असून, त्याचा योग्य तो मोबदला घेण्यासाठी मी पात्र आहे. पुरुषांना मिळणाऱ्या मानधनाविषयी कधीच का बोलले जात नाही? त्यांनासुद्धा हा सवाल केला पाहिजे. आज मी सहकलाकारांसह (पुरुष) ‘टॉप १० ऑफ इंडिया’च्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव अभिनेत्री असल्याचा मला अभिमान आहे. माझ्यात कष्ट करण्याची ताकद असल्यामुळेच मी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू शकते.’

वाचा : जेव्हा सारा तेंडुलकरही एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा वापरते

चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचच्या अनुभवाला सामोरे जाते. मात्र, प्रत्येक अभिनेत्री याविषयी खुलेपणाने बोलतेच असे नाही. पुरुषांनाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागू शकतो, असे प्रियांका आगामी इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार या रिअॅलिटी शोविषयी बोलताना म्हणाली.